टॉप बातम्या

दसरा मेळाव्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर शिवसेनेचा मेळावा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या निर्देशनाने जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी पाहता यंदाचा दसरा मेळावा मुंबईत मोठ्या प्रमाणावर न करता, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचे आदेश देण्यात आले.

या आदेशानुसार मारेगाव तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशालभाऊ किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतांवर भेट दिली. शहर प्रमुख विजुभाऊ मेश्राम, उपतालुकाप्रमुख प्रशांत भंडारी, विभाग प्रमुख धनराज भट, युवा उपतालुकाप्रमुख सचिन ढोके, युवा सेनाविभाग प्रमुख प्रवीण गमे, शहर विभाग प्रमुख विठ्ठल गेडाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.

शेतकरी बाबाराव झाडे, रमेश झाडे, अशोक झाडे, बलकी पाटील, अंकुश घोटेकर, राजू कुरेकर, जरीफ अहमद, केशव मुंगाठे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. शेतात जाऊन झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांची अडचण जाणून घेण्यात आली. पाहणीत असे दिसून आले की, यावर्षी ज्या क्षेत्रात पूर्वी कधी नुकसान होत नव्हते, त्या भागातही अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या दौऱ्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करून शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवसेना व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचा निर्धार या भेटीतून व्यक्त करण्यात आला.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();