Top News

पंजाबराव डखांचा नवा अंदाज: राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांनी घ्या ही काळजी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

परभणी : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

7 जूनपासून पावसाची दमदार हजेरी
7, 8, 9 आणि 10 जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचे जोरदार सरी कोसळणार आहेत.
ज्यांना हळद लावायची आहे, त्यांनी आता लावणे फायदेशीर ठरेल.ज्यांना मुगाची पेरणी करायची आहे, त्यांनी लवकर पेरणी करावी, कारण लवकर पेरणी केलेल्या मुगाला चांगला उतार मिळतो. 

13 ते 17 जून दरम्यान पावसाचा कहर
13 ते 17 जून दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे
उडीद पेरायचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे, कारण जमिनीच्या 1-2 फुटांपर्यंत ओल गेलेली आहे

पावसाची ठिकाणं आणि तारखा
• नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगोळा, जळगाव – 3 व 4 जून रोजी पावसाची शक्यता.
• कोकण – पावसाच्या सऱ्या सुरूच राहणार.
• कोल्हापूर परिसर – 31 मे ते 7 जून दरम्यान पावसाच्या सऱ्या दिसून येतील.
• धुळे, नंदुरबार – 4 व 5 जूनला पुन्हा सरी येणार. 

शेतकऱ्यांसाठी सल्ला
पेरणीचा निर्णय स्वतःच्या जमिनीची ओल पाहून घ्या
जर जमिनीत ओल आहे, तर पेरणीला हरकत नाही. 
शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या सांगण्यावर न जाता स्वतः निर्णय घ्यावा, असं आवाहन डख सरांनी केलं आहे.
"मी स्वतः शेतकरी आहे. जमिनीला ओल असेल तर पेरणी यशस्वी होते हे मला ठाऊक आहे," असं पंजाबराव डख म्हणाले.

महत्वाचं
यंदा जून महिन्याच्या अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे..!
Previous Post Next Post