Top News

मोहन पाचभाई यांचं अपघाती निधन

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : पीसगांव येथील मोहन पाचभाई (55) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मारेगाव-मार्डी रोड वरील पाथरी फाट्यावर त्यांच्या दुचाकीला ला अपघात होऊन ही घटना घडली.दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारसायकल ने त्यांना समोरासमोर धडक दिली आणि हा जीवघेणा अपघात झाला.

मारेगाव येथील कास्तकार कृषी केंद्रात मागील 12 वर्षांपासून कार्यरत असलेले मोहन पाचभाई हे नेहमीप्रमाणे कामकाज आटोपून सायंकाळी गावाकडे दुचाकीने निघाले, अशातच पाथरी फाट्यावर समोरून येणाऱ्या मोटारसायकलने मोहन यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात ते खाली पडले. डोक्याला गंभीर इजा झाली.त्यांना तत्काळ मारेगाव येथे प्राथमिक उपचार करून वणीकडे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

ही दि. 31 मे रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजता च्या दरम्यान घडली असा कयास आहे.या घटनेची मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून शामराव मालेकर यांचेवर कलम 106 (1),281, नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहे.
Previous Post Next Post