सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
झरी जामणी : तालुक्यातील खातेरा येथील एका महिलेने पैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
समीक्षा कौस्तुभ खडसे (25) रा. खातेरा असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समीक्षा हिच्या पश्चात पती, सासू,सासरे व केवळ दोन वर्षाचा चिमुकला मुलगा असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.