Top News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग;आरोपीला दोन वर्षाचा सक्षम कारावास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्वयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी पांढरकवडा सत्र न्यायालयाने अजित कुमार मिश्रा (मुळ रा. परेना ता.जि. शिवांग रा. बिहार) हमु भालर या आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षाचा सक्षम करावासाची शिक्षा व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या बाबात अधिक माहिती अशी की, मागील पाच वर्षा अगोदर भालर वसाहत 30/09/2019 रोजी एका 14 वर्षाच्या अल्वयीन मुलीचा विनयभंग केला होता. वेकोली इंजिनियर अजित कुमार मिश्राने पिडीत मुलीला ट्युशन ला जात असताना तिच्याशी अश्लील संवाद साधत विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत पीडित मुलीने वडिलांना आपबीती सांगितली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानुसार कलम 354(A),(D)354, 341 ipc सह कलम12 पॉक्सो अंतर्गत आरोपी वर गुन्हा दाखल केला होता.

सदरील प्रकरणाचा तपास करून आरोपी विरुद्ध पांढरकवडा सत्र न्यायालयात प्रकरण सुरु होते. न्यायालयाने सबळ पुरावे व पीडितेच्या बयानावरून न्यायदंडाधिकारी यांनी सदरील खटल्याचा अंतिम निकाल देत आरोपी अजित कुमार मिश्रा यास दोषी ठरवून दोन वर्ष कठोर करावासाची शिक्षा सुनावली आणि एक लाख रुपये दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास अधिकारी ए पी आय सतीश चावरे यांच्या सह एल सी पथक यवतमाळ यांनी तपास करून सदरील आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील प्रशांत मानकर यांनी पीडितेची बाजू मांडली, कोर्ट परैवी अधिकारी आशिष टेकाडे यांनी काम पाहिले आहे.
Previous Post Next Post