सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : अँड्रॉइड युगातही विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यासाची सवय, गोडी कायम राहण्यासाठी अभ्यासिका ची गरज होती. विद्यार्थ्यांची ही गोष्ट लक्षात घेऊन, विचोडा (बु) येथील विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करू शकतील, असा सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ता अनिल डोंगरे यांच्या पुढाकारातून आज 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त चांदसुर्ला, विचोडा (रई) येथील पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, टिफिन बॉक्स इत्यादी भेटवस्तू दिल्या आहेत.
या अभ्यासिकेचे उद्घाटन चंद्रपूर उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपजिल्हाधिकारी व्यवहारे यांनी अभ्यासिकेचे महत्त्व विशद करून ही एक संधी आहे, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी अनिल डोंगरे हे चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे उत्कृष्ट कार्य करत असून आता त्यासोबत विद्यार्थी शिक्षणात मागे पडला नाही पाहिजे, त्यांना आपली कुठेतरी गरज आहे. यासाठी अभ्यासिका सारखे समाज उपयोगी कार्यासोबत विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून समोर येत आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विचोडा (बू) येथे विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 02, 2025
Rating: