18 वर्षीय युवतीवर बळजबरी, महाराष्ट्र दिनी घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : 18 वर्षीय युवती वर झालेल्या शारीरिक व अनैसर्गिक अत्याचारच्या घटनेने वणी हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे दिवसा वणी शहरातील गॅस गोडाऊनचे मागे गांधी नगर परिसरातील तळ्या जवळ हा लाजिरवाणा प्रकार घडल्याची माहिती आहे. 

पीडित युवती विटा भट्टी कडे तुटलेल्या विटा गोळा करण्यासाठी जात असता तिला अनोळखी आरोपीने मागून जोरात पकडून तिला लाथाबुक्याने मारहाण करून त्यानंतर तिला बाजूला नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप आहे. ही घटना 1 मे रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

पीडितेच्या जबानी रिपोर्ट वरून आज दि. 2 ला अनोळखी इसमावर सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोउपनि धनंजय रत्नपारखी हे करत आहे.
18 वर्षीय युवतीवर बळजबरी, महाराष्ट्र दिनी घटना 18 वर्षीय युवतीवर बळजबरी, महाराष्ट्र दिनी घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on May 02, 2025 Rating: 5
Powered by Blogger.