मायलेकी बेपत्ता, पोलिसात तक्रार...


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वरोरा : बेपत्ता होण्याची अनेक घटना सध्या समोर येत आहेत. अशातच केळी येथील एक मायलेकी बेपत्ता झाल्याची बातमी आहे. या घटनेत प्रियंका संदीप किनाके(30) आणि अडीच वर्षांची मुलगी रियांशी 27 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. संतोष बापुना गेडाम रा. वडकी ता. राळेगाव, यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

प्रियंका आणि रियांशी ही 27 एप्रिल पासून सासरी किरकोळ वाद निर्माण झाल्यामुळे माहेरी जाते असं सांगून सकाळी दहा वाजता गेल्या आहेत.मात्र, त्या वडिलांकडे पोहचली नसल्याने सर्वत्र विचारपूस करून तिची बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या मायलेकी कुठे आढळून आल्यास 7057839682 या मोबाईल क्रमांकावर कळवावे व पोलिसांनाही माहिती द्यावी असे, आवाहन तक्रारकर्त्यांसह पोलिसांनी केले.

प्रिंकाचे वर्णन रंग सावळा, उंची 5 फुट, केस लांब, अंगात सलवार सुट, चेहयावर थोडे डाग व रियांशी हिचा सावळा रंग उंची 2 फूट,केस बारीक, अंगात डंगरी घातलेली. 
मायलेकी बेपत्ता, पोलिसात तक्रार... मायलेकी बेपत्ता, पोलिसात तक्रार... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2025 Rating: 5
Powered by Blogger.