आता फक्त 5 दिवस उरलेत!, त्वरा करा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीः आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी संभाषणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इयत्ता 3 री ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्याथी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी हे शिबिर अत्यंत सोयीचे आहे. हे शिबिर शहरातील, जनता शाळेजवळील, गुरूनगर येथील, हनुमानमंदिर जवळ, टागोर चौकातील के.बी.सी. हाईट्स बिल्डिंग, नवीन महाराष्ट्र
बँकेच्यावर,राईजअप कॉम्प्युटर, सुरेश बदखल यांच्या घरी जैन ले-आऊट, छोरिया ले-आऊटमधील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल, आनंदनगर येथील बालविद्या मंदिर, चिखलगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे होईल.
या शिबिरात बेसिक इंग्लिश म्हणजे पायाभूत इंग्रजीवर भर देण्यात येईल. इंग्रजी बोलण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या शिकवण्यात येतील. विद्यार्थ्यांकडून बोलण्याचा सराव करून घेण्यात येईल. नोंदणी 7038204209 या मोबाईल नंबरवर 20 एप्रिल ते 1 मे दरम्यान करता येईल.या शिबिरादरम्यान प्रत्येक शिबिरार्थ्याला प्रिंटेड नोटस् देण्यात येतील. सोबतच प्रत्येक शिबिरार्थ्याला रोजच्या प्रशिक्षणाच्या ऑडिओ क्लिप्स स्मार्टफोनवर पाठवण्यात येतील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल. नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ सराव आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील. 

शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. संपूर्ण शिबिरार्थ्यांसह सिनेमा पाहिला जाईल. स्विमिंग आणि अन्य इनडोअर आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीरकण होईल. अधिक माहितीसाठी एस. पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात प्रा. सागर जाधव यांच्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. तेव्हा या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
आता फक्त 5 दिवस उरलेत!, त्वरा करा... आता फक्त 5 दिवस उरलेत!, त्वरा करा... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2025 Rating: 5
Powered by Blogger.