भाकप च्या आंदोलनापुढे जि.आर.एन.कंपनी झुकली, बेलोरा (निलजई) येथील बेरोजगारांना सात दिवसात नौकरीवर घेण्याचे आश्वासन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : बेलोरा (निलजई) परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्यासाठी शुक्रवार 25 एप्रिल पासुन कंपनीसमोर भाकपचे नेत्रुत्वात बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत कंपनीने प्रतिसाद न दिल्याने दुसरे दिवशी 26 एप्रीलला आंदोलकांनी कंपनी बंद करण्याचा ईशारा देताच कंपनी प्रशासनाने झुकते माप घेत मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली व भाकपला चर्चेचे आमंत्रण दिले.

झालेल्या बैठकीत वेकोली वणी क्षेत्राचे महाव्यवस्थापक, कंपनी व्यवस्थापन प्रतिनीधी व भाकपचे शिष्टमंडळात वणी विधानसभा क्षेत्राचे भाकप नेते काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,शिंदोला जि.प. सर्कलचे भाकप नेते काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवि गोरे, काॅ.मिलींद रामटेके हे सहभागी झाले. चर्चेमध्ये बेलोरा (निलजई) येथील स्थानिक बेरोजगारांना सात दिवसात नौकरी देण्याचे कंपनीने आश्वासन दिले. त्यानुसार तिसरे दिवशी 27 एप्रिल रविवारला भाकपने कंपनीला बेरोजगारांची यादी सोपवुन राज्य कौंसिल सदस्य काॅ.सुनिल गेडाम,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे यांचे उपस्थितीत आंदोलकांनी आंदोलनाच्या विजयाच्या घोषणा देत आंदोलनाचा समारोप करण्यात आला. 

याप्रसंगी शेकडो युवकांनी व गावकरयांनी भाकपची सभासद नोंदणी केली. यशस्वितेसाठी काॅ.मोरेश्वर कुंटलवार,रवि गोरे,मिलींद रामटेके,महेश ईंगोले,संदीप ईंगोले,सुनिल मडावी,प्रभाकर डंबारे,संतोष ईंगोले,हुसेन ईंगोले,गजाजन कोयचाडे,हनुमान भोयर,विकास कोडापे,अविनाश पचारे,अविनाश ईंगोले,प्रकाश पारशिवे,अनिल मडावी,गोसाई पारशिवे,बंडु मडावी,आनंद कोयचाडे,संताष ईंगोले,शैलेष कांबळे,ज्ञानेश्वर चौधरी,दिनेश चिट्टलवार,दिपक पारशिवे,सुरेश ईंगोले,विजु पोतराजे,शुभम टेकाम,प्रविण कामरे,शिवराम बरडे,संतोष दुर्वे,विजय डवरे,अमोल रेगुंडवार,बाबाराव पचारे,ईश्वर ईंगोले,आशिष ईंगोले,गोपाल चिटपल्लीवार,गौरव बोबडे,विनोद उईके,रवी मडावी यांचेसह शेकडो युवकांनी अथक परिश्रम घेतले.
भाकप च्या आंदोलनापुढे जि.आर.एन.कंपनी झुकली, बेलोरा (निलजई) येथील बेरोजगारांना सात दिवसात नौकरीवर घेण्याचे आश्वासन भाकप च्या आंदोलनापुढे जि.आर.एन.कंपनी झुकली, बेलोरा (निलजई) येथील बेरोजगारांना सात दिवसात नौकरीवर घेण्याचे आश्वासन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2025 Rating: 5
Powered by Blogger.