आदिवासी बेरोजगार तरुणांना स्थानिक कंपन्यामधे रोजगार द्या - ए टी एस


सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यात नावाजलेल्या अनेक खाजगी कंपन्या आहेत.त्या कंपन्यामध्ये परप्रांतीय व राजकीय नेते ह्यांच्याशी सलोखा असणाऱ्या किवा स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी यांच्याशी संबध असणारे ह्यांचीच शिफारिस असेल तर त्या कंपनी मध्ये खाजगी रोजगार दिला जातो. अशी खंत जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

चंद्रपूर गडचिरोली आदिवासी बहुल जिल्हे असून अनेक आदिवासी बेरीजगार युवक आहेत. त्यांना जिल्ह्यातील विविध कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा अश्या मागणी चे निवेदन नामदार डॉ.प्रा.अशोकराव उईके आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर महा.राज्य यांना आज संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, जितेश कुळमेथे विदर्भ प्रवक्ता,साईनाथ कोडापे विदर्भ सचिव,आदिवासी टायगर सेना च्या वतीने करण्यात आली.
आदिवासी बेरोजगार तरुणांना स्थानिक कंपन्यामधे रोजगार द्या - ए टी एस आदिवासी बेरोजगार तरुणांना स्थानिक कंपन्यामधे रोजगार द्या - ए टी एस Reviewed by सह्याद्री चौफेर on March 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.