स्व. सिंधुताई मस्की स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयाला फोल्डिंग बेड भेट...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : स्वर्गीय सिंधुताई दिगांबर मस्की यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री. दिगांबर मस्की यांच्याकडून येथिल ग्रामीण रुग्णालय मारेगाव,आज दिनांक ३१ मार्च २०२५ ला रुग्णालयातील रुग्ण सेवेसाठी फोल्डिंग बेड भेट देण्यात आला. 

विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या कोसोदूर असलेले हे परिवार, सामाजिक कार्यात मात्र सतत हिरीरीने नेहमीच मस्की परिवार अग्रेसर असतात. यावेळी सुद्धा "मस्की" कुटुंबीय सामाजिक कार्यात सरसावल्याचे दिसून आले आहे. येथील श्री. दिगांबर मस्की यांच्या सामाजिक जणींवेतून स्वर्गीय सिंधुताई दिगांबर मस्की यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज सोमवार ला ग्रामीण रुग्णालयाला रुग्ण सेवेसाठी फोल्डिंग बेड भेट देण्यात आला आहे. 

त्यानिमित्त उपस्थित असलेले मान्यवर दिगाबरराव नारायण मस्की, प्रा.डॉ.राजेंद्र कुमार सुर ,श्री सुनील कोगरे, श्री गोपाल काळे, मारुती भाऊ देवाळकर, डॉ. मनीष तुळशीराम मस्की नगरपंचायत नगराध्यक्ष मारेगाव, श्रेयश गोपालराव काळे ,भार्गव मनीष मस्की व ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, सिस्टर्स, व ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण स्टॉप प्रामुख्याने हजर होते. 
स्व. सिंधुताई मस्की स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयाला फोल्डिंग बेड भेट... स्व. सिंधुताई मस्की स्मृतिप्रित्यर्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयाला फोल्डिंग बेड भेट... Reviewed by सह्याद्री चौफेर on March 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.