घराच्या बांधकामावरून वाद; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी : शहरातील भगतसिंग चौक, इंगोले मेडिकलजवळ घराच्या बांधकामावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविंद्र धनराज गुप्ता (वय ३०, रा. रंगनाथनगर, कोंडाणावाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शास्त्री नगर येथील साठ वर्षीय महिलेसह विकास गजानन बोंडे (वय २१, रा. जागृती नगर) व प्रशांत मारोती गाडगे (वय ४०, रा. शास्त्रीनगर) यांच्यासोबत घराच्या बांधकामावरून वाद झाला.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, महिला आरोपीने फिर्यादी रविंद्र गुप्ता यांना शिवीगाळ केली, तर आरोपी विकास बोंडे याने हातातील कड्याने मारहाण केली, ज्यामुळे गुप्ता यांच्या डाव्या बाजूच्या कानाजवळ जखम झाली व रक्त स्त्राव झाला. तसेच आरोपी प्रशांत गाडगे याने कॉलर पकडून थापडबुक्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर रविंद्र गुप्ता यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 118 (1), 115 (2), 352, 351(2), (3), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मारोती पाटील पोलीस स्टेशन वणी करत आहेत.
घराच्या बांधकामावरून वाद; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल घराच्या बांधकामावरून वाद; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on April 01, 2025 Rating: 5
Powered by Blogger.