क्षुल्लक कारणावरून मारहाण,तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वर्दळी च्या ठिकाणी मोटारसायकल ला कट लागला म्हणून एका इसमास त्याचे घरी जाऊन मारहाण केल्याची तक्रार गुरुवारी रात्री 8.30 वाजता घडली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

अर्पित अग्रवाल (25), विजय अग्रवाल (55) व संजय गोयल (50) रा. वणी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कृष्णकुमार नंदकिशोर वर्मा (63), रा. राम मंदिर जुनी स्टेट बँक जवळ वणी यांनी याबाबत तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार फिर्यादी गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलवरून गांधी चौकातून घराकडे जात होते. दरम्यान गांधी चौकाकडे जात असलेल्या अर्पित अग्रवाल याच्या दुचाकीचा त्यांच्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर फिर्यादीने दुर्लक्ष करून घराकडे निघून गेला. मात्र, अर्पित हा त्यांच्या मागेच घरी आला व फिर्यादी सोबत परत वाद करुन शिवीगाळ केली.

त्यानंतर अर्पित अग्रवाल यांनी फोन करून त्याचे वडील विजय अग्रवाल यांना बोलाविले. विजय अग्रवाल यांनी फिर्यादी यास शिवीगाळ व थापड बुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय त्यांच्या सोबत आलेला संजय गोयल यांनीसुद्धा शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी मधात आली असता तिलाही शिवीगाळ व ढकलढुकल केले. क्षुल्लक कारणावरून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी यांनी लावला आहे. फिर्यादी कृष्णकुमार नंदकिशोर वर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गैरअर्जदार विरुद्ध कलम 115(2), 352, 351(2), 351(3) BNS नुसार गुन्हा दाखल केला.
क्षुल्लक कारणावरून मारहाण,तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल क्षुल्लक कारणावरून मारहाण,तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on March 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.