यवतमाळ : लाखांचा मुद्देमाल आयजींच्या हस्ते वितरित

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : फेब्रुवारी महीन्याच्या पहील्या आठवड्यात वणी शहरातील साधनकर वाडीत राहणारे विमा कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी प्रदीप चिंडालीया यांच्या घरात झालेल्या घरफोडीत 14 लाख 80 हजार रूपयाचा माल चोरट्यानी लंपास केला होता. तसेच 6 डिसेंबर ला येथील जिल्हा परीषद कॉलनीतील कमलबाई भुसारी यांचे 9 तोळे सोने व 45 हजार रूपये रोख चोरट्याने लंपास केले होते. दोन्ही गुन्ह्याच्या आरोपींना वणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून मुद्देमाल जप्त केला होता.
                       
गुरूवारी यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात अमरावती परिक्षेत्राचे विशेष आयजी रामनाथ पोकळे यांच्या हस्ते चोरी गेलेला मुद्देमाल तक्रारदाराला परत करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

यात उज्वला प्रदीप चिंडालिया यांना 142.25 ग्रॅम सोने व 47.760 ग्रॅम चांदी देण्यात आली. कमलबाई बाळकृष्ण भुसारी यांना 89.140 ग्रॅम सोने परत देण्यात आले. 

यावेळी वणी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर हे उपस्थित होते.
यवतमाळ : लाखांचा मुद्देमाल आयजींच्या हस्ते वितरित यवतमाळ : लाखांचा मुद्देमाल आयजींच्या हस्ते वितरित Reviewed by सह्याद्री चौफेर on March 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.