मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांमध्ये निवारा हा महत्त्वाचा घटक असून तो आम्हाला मिळालाच पाहिजेत . यासाठी मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीने संविधानात्मक मार्गाने महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात नुकतेच आझाद मैदानात धरणे आंदोलन केले असून यामध्ये प्रामुख्याने" केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे " या धोरणाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अर्थमंत्री अजित पवार, यांच्याकडे मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी रीतसर करून त्यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
       
त्यानुसार मुंबई महानगरातील भाडेतत्त्वावर राहणारे शेकडो महिला आझाद मैदान मध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या असून आपल्याला हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त करत होता. यावेळी संघाचे संस्थापक जगदीश भाई कुमार इंगळे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात आपल्याला जे काही अधिकार मिळाले आहेत त्याकडे सरकार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेले असताना आपल्याला राहण्याची हक्काचे घर नाही यापेक्षा दुसरी कोणती शोकांतिका नाही त्यासाठीच मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन उभे केले.शासनाने जर दखल घेतली नाही तर संपूर्ण मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करण्याचा इशारा आंदोलनातून दिला आहे.
      
केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व येथे घरे योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे गरजवंतांना घराचा लाभ मिळत नाही त्यामुळे शासनाने गंभीर बाबीचा विचार करून मुंबई महानगरातील बेघर नागरिकांना शासनाच्या "सर्वांसाठी घरे" योजनेची त्वरित अंमलबजावणी करून सर्व भाडेकरूंना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय त्वरित काढून भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे असा इशाराही मुंबई भाडेकरू रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे व मुंबई प्रदेशाध्यक्ष गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांनी आंदोलनातून देण्यात आला आहे.. 
   
या आंदोलनाच्या निमित्ताने पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांनी गृहनिर्माण उपसचिव अजित कवडे यांची भेट घेऊन आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून निवेदन देण्यात आले. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आपला प्रश्न सोडवण्यात येईल ज्यांना भारतात/महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे घर नाही अशा बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येतील असेही आश्वासन दिले.
        
या आंदोलनात मुंबई महानगरातील मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे सचिव कविता निकाळजे, कल्पना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी, भांडुप, सायन, मानखुर्द, घाटकोपर, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगर, भागातून भाडेकरू रहिवासी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन संपन्न मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on March 31, 2025 Rating: 5
Powered by Blogger.