सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. परीक्षार्थीनी कोणताही ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होत आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. यंदाही परीक्षेला निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला असून १५ मे पर्यंत निकाल लावण्याचे उद्दिष्ट आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.
ऑल द बेस्ट: बारावीची आजपासून परीक्षा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2025
Rating: