आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) च्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : आशा व गटप्रवर्तक संघटना (सिटू) चे दुसरे जिल्हा अधिवेशन ९ फेब्रुवारी २०२५ रोजी यवतमाळ येथील कॉमरेड सीताराम येचुरी सभागृह (भावे मंगल कार्यालय) येथे संपन्न झाले. दर तीन वर्षांनी होणाऱ्या जिल्हा अधिवेशनात उद्घाटन संघटनेच्या राज्य कोषाध्यक्ष कॉ. अर्चना घुगरे होत्या तर अध्यक्ष म्हणून माकप चे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. मनिष इसाळकर हे होते. 

या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेच्या राज्य महासचिव कॉ. पुष्पाताई पाटील, माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. सरिता दानव हे होते.

सुरुवातीला सिटू च्या विळा हातोडा चिन्ह असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली आणि अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्रद्धांजली ठराव घेऊन संघटनेचा यवतमाळ जिल्ह्याचा संघटनात्मक अहवाल संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांनी मांडला. या अहवालावर अनेक आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींनी साधक बाधक आपली मते मांडून अहवालाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याच सोबत पुढील तीन वर्षासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येऊन काही महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. 

शेवटी १७ प्रतिनिधींची नूतन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या मध्ये अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी यांची तर जिल्हा सचिव पदी कॉ. उषा मुरखे यांची निवड करण्यात येऊन उपाध्यक्ष पदी कॉ. प्रीती करमनकर, आशा धोंगडे, ज्योत्स्ना फुलमाळी, सहसचिव अर्चना सावरकर, सुनिता राठोड, अर्चना चौधरी, कोषाध्यक्ष सुजाता बैस, कार्यकारिणी सदस्य चंदा मडावी, कुंदा देहारकर, लीना गाजरे, निर्मला मेश्राम, वंदना बेस, विशाखा कांबळे, छाया क्षीरसागर, संगीता डेरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनाचे कामकाज कॉ. उषा मुरखे यांनी तर आभार कॉ. सुजाता बैस यांनी मानले. राष्ट्र गीताने अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनाचे मुख्य द्वाराला कॉ. शंकरराव दानव यांचे नाव देण्यात आले होते. अधिवेशनाला जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून संघटनेला तनमन धनाने भरीव मदत करून संघटना वाढवून संघटना वाढविण्याचा निर्धार केला.
आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) च्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) च्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on February 11, 2025 Rating: 5
Powered by Blogger.