टॉप बातम्या

चोरट्याने 90 हजार उडवले, पोलिसांनी 24 तासात मिळवून दिले; दीपक चौपाटीतील धक्कादायक घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : डिबी पथकाने अवघ्या 24 तासात गाडीच्या डिक्कीतून चोरून नेलेले कापसाचा चुकारा नव्वद हजार रुपये परत मिळवले. याबाबत कास्तकार सचिन संजय देवतळे रा.गाडेगाव ता. कोरपना जि चंद्रपूर यांनी दि.9 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार नोंदवली होती.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार सचिन देवतळे यांनी 9 फेब्रुवारी ला कापूस विक्रीसाठी आणला होता. त्यास मिळालेल्या कापसाचे चुका-याचे 90,000/-रुपये दीपक टॉकिज परिसरात कोणीतरी अज्ञात ईसमाने पिकअपच्या ड्राव्हर मध्ये पेपर मध्ये गुंडाळुन ठेवलेले नव्वद हजार रुपये चोरुन नेले होते. ही बाब जेव्हा शेतकरी वाहनाजवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आली. याबाबत तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होताच उपविभगीय पोलिस आधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख पो.उपनि. गुल्हाने यांनी तत्काळ तपासाची चक्र अतिशीघ्र फिरवून घटनास्थळाचे बारकाईने सिसिटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली असता संशयित आरोपी सागर अशोकराव घोसे (वय 33) रा.अलीपुर ता. हिंगणघाट जि. वर्धा ह.मु.रामपुरा वार्ड, वणी यास 24 तासाचे आत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. 

दरम्यान,चोरीस गेलेला मुद्देमाल रुपये 90,000/- व गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी क्र. (MH 29, CD-0317) सह किंमत 60,000/- असे एकूण 1 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पो. उपनि गुल्हाने, डिबी पथक पो.का. मो वसिम, पो. का. श्याम, पो.का. निरंजन, पो.का. गजानन,पो. का. मोनेश्वर यांनी केली.


Previous Post Next Post