सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यामध्ये सन २०१० पासून आरटीआय क्लब कार्यकारणी कार्यरत आहेत. सदर जुनी कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नुकतीच आर.टी.आय क्लब वणी येथील नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून सदर कार्यकारणी निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांची बैठक दिनांक १८/०१/२०२५ रोजी शनिवारी श्री रंगनाथ स्वामी मंदिर वणी येथे पार पडली.
यामध्ये सर्व सदस्यांमध्ये आरटीआय क्लबचे अध्यक्ष पदी सर्वानुमते श्री राजेंद्र अरके यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून जवाहर अरोरा यांची निवड करण्यात आली. सदर या आर. टी. आय क्लब मिटिंग दादाजी पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी उपस्थित आरटीआय क्लबचे जिल्हा संघटक दादाजी पोटे, प्रशांत जुमनाके (सचिव), पी.के.टोंगे (सल्लागार), बापूराव गेडाम, अविनाश बुधकोंडवार, वैभव पोटवडे, योगेश तेजे, विनोद खडारे, जलील शेख, दिनेश पारखी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर.टी.आय (RTI) क्लब शाखा वणी ची कार्यकारणी गठीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 10, 2025
Rating: