पालकमंत्री ना.अशोक उईके यांची आंदोलनाला भेट!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राळेगाव : दिंदोडा येथे प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्याया विरोधात 23 जानेवारीपासुन दिंदोडा बॅरेज प्रकल्प स्थळी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजुर, मच्छीमार बांधवांचे कुटुंबासह "चुला जलावो, धरणे, नारे निदर्शने, ठिय्या आंदोलन" सुरू होते. 

आंदोलनाच्या अठराव्या दिवशी (ता. 9) पालकमंत्री ना.अशोक उईके, समीर कुनावार आमदार हिंगणघाट, समुद्रपुर विधानसभा, करण देवतळे आमदार वरोरा, भद्रावती विधानसभा, माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा, विनय गवडा चंद्रपूर जिल्हाधिकारी, जेनित चन्द्रा उपविभागीय अधिकारी वरोरा, तहसिलदार वरोरा, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, ठाणेदार वरोरा, यांनी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या समजून घेऊन ना.अशोक उईके यांनी मी मुख्यमंत्र्यांशी बैठक लावून व योग्य तो निर्णय तातडीने घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला त्यासंदर्भात  कळवितो असे आश्वसित केले.

त्यामुळे गेल्या अठरा दिवसापासून सुरु असलेले "चूल जलाओ आंदोलन" तूर्तास स्थगित करण्यात आले असून मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय निर्णय घेतात याकडे प्रकल्पाग्रस्त संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे. 
पालकमंत्री ना.अशोक उईके यांची आंदोलनाला भेट! पालकमंत्री ना.अशोक उईके यांची आंदोलनाला भेट! Reviewed by सह्याद्री चौफेर on February 10, 2025 Rating: 5
Powered by Blogger.