सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी तालुक्यात वेकोलीच्या आठ कोळसा खाणी आहेत. त्यामुळे वणीतील युवकांना रोजगार देणारा सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र, भूमिपुत्रांना व नव्याने वेकोलीत नोकरी लागलेल्या युवकांना शिक्षा म्हणून त्याच्या कार्यक्षमतेची कसोटी तपासण्यासाठी त्यांना भांदेवाडा येथिल भूमिगत खानीत नेमणूक दिल्या जाते. म्हणून या भूमिगत कोळसा खानीत कोणत्या समस्या आहेत,हे जाणून घेण्याची उत्सुकता आमदार संजय देरकर यांना होती. त्यामुळे त्यांनी शनिवारी 8 फेब्रुवारीला प्रत्यक्ष भांदेवाडा भूमिगत खानीत आतमध्ये प्रवेश करून समस्या जाणून घेतल्या.
आमदार संजय देरकर हे शनिवारी दुपारी एक वाजता वेकोलीचे अधिकारी तसेच कार्यकत्यासह खानीत उतरले. खानीतील किर्र अंधार व चढ उताराचे रस्ते पार करीत त्यांनी तब्बल चार तास खानीत पायी प्रवास केला.
वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. संगीवारेड्डी,क्षेत्रीय उप-प्रबंधक सय्यद नाझीमुद्दीन, क्षेत्रीय कार्मीक प्रबंधक ओ. पी. करोले, खान व्यवस्थापक राहुल गवई यांनी खानीतील सर्व कामकाजाची माहिती दिली. तसेच वेकोली तर्फे आमदार देरकर यांचे स्वागत करण्यात आले. भूमिगत कोळसा खानीला प्रत्यक्ष भेट देणारे आ.देरकर हे पहिलेच आमदार असल्याने खान व्यवस्थापनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
खानीबदल माहिती देताना उपक्षेत्रीय प्रबंधक सय्यद नाझोमुद्दीन म्हणाले की वणी विभागात प्राचीन काळी एखाद्या नदीचे खोरे असावे त्याचेसभोवार घनदाट जंगले असावे. काळाच्या ओघात भौगोलीक उलथापालथ होऊन जंगल जमिनीखाली दाबले गेले व त्यापासुन वणी परिसरात भूगर्भात प्रचंड असे कोळशाचे थर निर्माण झालेआहे.
भांदेवाडा भूमिगत खानीला 30 ते 35 वर्ष झाली. मात्र, अजुन येथिल 25 टक्केही कोळसा बाहेर काढला गेला नाही. या खानीत तीन पाळ्यात कामगार काम करतात. प्रत्येक पाळीतुन 50 ते 60 टन कोळसा बाहेर काढला जातो. या खानीतुन मिळणारे उत्पादन खर्चापेक्षा अधिक आहे. मात्र, भूमिगत खानीचे एक मॉडेल टिकविण्यासाठी वेकोलि प्रशासन ही भूमिगत खान सुरु आहे, असे राहूल गवई यांनी स्पष्ट केले. ही कोळसा खान जमिनीपासुन 100 ते 150 मीटर खोलीवर आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत.
आमदार देरकर यांनी खानीत काम करणारे कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व कोळसा कसा काढला जातो यांचे प्रात्यक्षिकही डोळ्याने बघीतले. खानीत जाने -येणेचा त्रास सोडला तर बाकी कोणत्याही समस्या नसल्याचे कामगारांनी आमदार देरकर यांना सांगितले.
खाणीतील प्रत्यक्ष कामकाज बघुन डोळ्याचे पारणे फीटले.फक्त खाणीत जाणे-येणे साठी एकच प्रवेशद्वार आहेत ते खटकले. प्रवेशद्वार दोन-तीन करावे अशी मागणी मी केंद्रीय खानमंत्र्याकडे करणार आहे.-संजय देरकरआमदार,वणी विधानसभा क्षेत्र
आमदार संजयजी देरकर यांनी आमच्या भूमिगत खाणीला भेट देऊन सुरक्षीततेची माहीती घेतली.कामगारांचा उत्साह वाढविला याबद्दल मला आनंद झाला. ते वेकोलिच्या कामकाजाबाबत सकारात्मक विचार करणारे नेते वाटले. आम्हाला वेळोवेळी त्यांचे सहकार्य अपेक्षीत आहे.-सय्यद नाझीमुद्दीन,क्षेत्रीय उप प्रबंधक, भांदेवाडा भूमिगत खान
कामगारांच्या आपुलकीने समस्या जाणून घेणारे पाहिले आमदार - कामगार नेते सुनील मोहितकरवेकोलीतील कामगारांच्या अनेक समस्या आहे. त्यातल्या त्यात भूमिगत कोळसा खाणीत काम करणे म्हणजे जीव मुठीत घेवून काम करणे आहे. परंतु त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भूमिगत खाणीत जावून त्यांच्या समस्यांची जाणिव करून घेणारे आमदार संजय देरकर हे पहिले लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या या कृतीने वेकोली कामगारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
आ. संजय देरकरांनी राजूर-भांदेवाडा भूमिगत कोळसा खानीची केली प्रत्यक्ष पाहणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 10, 2025
Rating: