सिंधी येथील असंख्य महिला मारेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंधी (महागाव) गावात अवैध दारू विक्री होत असल्याने या गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावली असून, गावातील असलेले धार्मिक वातावरण बिघडत चालले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारून थेट ठाण्यात धडकल्या आहे. या संदर्भात त्यांनी ठाणेदार यांना निवेदने देऊन अवगत सुद्धा केले आहे.

निवेदनानुसार सिंधी ते पहापळ रस्त्यावर 8 फेब्रुवारी रोजी अंकुश वैद्य नामक व्यक्ति हा अवैध दारू विक्री करीत असताना महिलांना त्याला रंगेहात पकडले आणि दारू विकण्यास मज्जाव केला असता त्याने महिलांशी हुज्जत घालत 'मी कोणालाही भीत नाही, तुमच्याकडून जे करायचं ते करा' अशी दमदाटी दिली. अखेर संतापलेल्या महिलांनी आज दिनांक 9 फेब्रुवारीला मारेगाव पोलीस स्टेशन गाठून सिंधी येथील अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव यांना करण्यात आली. 

मारेगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून, विद्यार्थी व युवक व्यसनाधीनतेच्या वाटेवर जात आहे. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था सुद्धा भंग झाली आहे. शिवाय गोरगरीब महिलांचे संसार देखील उघड्यावर आल्याने गावागावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, यासाठी अनेकदा निवेदन दिलेली असूनही अवैध दारू बंद होत नाहीत. उलट विक्रेत्यांची हिम्मत वाढल्याने महिलांना अपमानित व्हावं लागत असून परिणामी भीतीचे वातावरणही निर्माण झाल्याचे दिसून येतं.

अशीच काहीशी स्थिती सिंधी गावात असून येथील अनेक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मारेगाव ठाण्यावर धडकल्या आणि अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. 

निवेदन देताना सरपंच निलिमा थेरे, संतोष निब्रड, पोलीस पाटील, पुरुषोत्तम भोयर, दिनेश झित्रूजी गेडाम, सोनू श्यामसुंदर ढवस, प्रियंका संदीप देवाळकर, सविता विलास नेहारे, छाया संतोष निब्रड, कुसुम डाखरे, सुरेखा म्हसे, संगीता महारतळे, कोमल डाहुले, विजया गोहोकर, प्रियंका देवाळकर, शशिकला लेडांगे, इंदुबाई लेडांगे, सोनाबाई भगत, रेखा महारतळे, लता जांभुळकर,अंजनाताई पोतराजे, सुरेखा गायकवाड, पल्लवी परचाके, मंजुषा जांभुळकर, सुनीता परचाके यांच्यासहित असंख्य महिला पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होत्या. आता पोलिस प्रशासन येथील अवैद्य दारू विक्री बंद करतात का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सिंधी येथील असंख्य महिला मारेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या! सिंधी येथील असंख्य महिला मारेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या! Reviewed by सह्याद्री चौफेर on February 09, 2025 Rating: 5
Powered by Blogger.