सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला. उद्घाटक म्हणुन लाभलेले आमदार संजय देरकर यांचे आगमन होताच, विरकुंड गावचे आराध्य दैवत असलेले हनुमान मंदिरात पुष्पहार अर्पण करुन शेकडोंच्या संख्येंने उपस्थित असलेल्या विरकुंड ग्रामवासियांच्या उपस्थिती ढोल-ताशांच्या गजरात तसेच ठिक-ठिकाणी पुष्पवृष्टी करुण भव्य मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्धाटनिय भाषणात आमदार संजय देरकर यांनी 'आमदार चषक' सामन्याच्या नियोजन बध्द केलेल्या आयोजनाबद्दल संयोजक विलास कालेकर व बजरंग क्रिडा मंडळ यांचे कौतुक केले.
मागील दहा ते पंधरा वर्षापासुन या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती असते परंतु दरवर्षी विलास कालेकर हे नवनविन संकल्पना आपल्या कार्यक्रमाध्ये करीत असतात. यावर्षी 'आमदार चषक' कबड्डीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण होत आहे. अशी कबड्डी स्पर्धा प्रथमच संपुर्ण विधान सभा क्षेत्रात प्रथमच होत आहे. याबद्दल विलास कालेकर यांचे आमदार संजय देरकर यांनी कौतुक केले.
या कार्यक्रामध्ये आनंद शेंडे, महादेव धगडी, जगन जुनगरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देठे तर प्रमुख पाहुणे म्हणुन मोरेश्वर उज्वलकर, निलेश चौधरी, भगवान मोहीते, संजय साखरकर, विनोद ढुमणे व ईतर मान्यवर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कालेकर यांनी तर उत्कृष्ट शब्दाची उधळण करणारे देवेंद्र बच्चेवार यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.उद्धाटनिय सामन्यांची आमदार संजय देरकर यांनी फित कापुन नवेगाव विरुध्द वाढोणा (बंदी) यांच्यात खेळवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येंने ग्रामवासी उपस्थित होते.
'आमदार चषक' कबड्डी सामन्याचे उद्घाटन विरकुंड येथे थाटात!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 09, 2025
Rating: