सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पोलीस खात्यात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांची वणी विभागाबाहेरील वेगवेगळ्या ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यात विकास धडसे, शुभम सोनुले, व सागर सिडाम यांचा समावेश आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच मनमानी कारभार, अवैध धंदयात भागीदारी यासह अनेक करणाम्यांनी वृत्त माध्यमातून खळबळ उडाल्याने या तीन कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी झाल्याची चर्चा आहे.
शिंदेसेना गटाचे वणीचे शहराध्यक्ष ललित लांजेवार यांचा 29 जानेवारी रोजी हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले, मात्र त्यांचे निधन धमकी दिल्यामुळे झाल्याचे मृतकाच्या पत्नी श्रीमती लांजेवार यांनी पत्रकार आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला असताना परत शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन त्या परिषदेतून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.शिवाय पालकमंत्री कधी ही वणीत येऊन लांजेवार कुटुंबीयांची भेट घेण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं होत. त्यामुळे आणखी काय प्रकरण वेगळं वळण घेणार याकडे शहरवाशियांचे लक्ष वेधले असताना त्या वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची विभागाबाहेर बदली करण्यात आली आहे.
वणी पोलीस स्टेशन मागील काही दिवसापासून अनेकानेक कारणांनी चर्चेत आहे. पोलिस निरिक्षक अनिल बेहरानी यांची नुकतेच बदली झाली आहे. आता डीबी पथकात कार्यरत विकास धडसे, शुभम सोनूले, सागर सीडाम यांची बदली झाली असून जिल्ह्यातील पुसद व दारव्हा म्हणजे वणी उपविभागाच्या बाहेर टाकण्यात आले. सध्या हे 'तीनमोती' रेजेवर असून वणी उपविभागात विविध चर्चेला उधाण आलं. स्व. ललित लांजेवार यांना धमकवण्यात आलं, त्यामुळेच त्यांच्या मनात धडकी निर्माण होऊन त्यांचा मृत्यू झाला,अवैद्य धंद्यात असलेली भागीदारी व 'माझे कोण काय करते' ही भुमिका अंगलट आली. त्यामुळे वादग्रस्त पोलीस कर्मचारी या तिघांची तत्काळ तडकाफडकी बदली केली. मात्र, ललित च्या निधनाला या बदलीमुळे न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत असून तूर्तास पोलीस अधीक्षकांनी कारवाई त्यांच्यावर रेती तस्करी बाबत करण्यात आली आहे.
वणी: तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 09, 2025
Rating: