वणी शहरात गुरू रविदास जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : समस्त जगाला समतेचा संदेश देणारे गुरू रविदास जयंती निमित्त वणी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी जिल्हा यवतमाळ, संत रविदास प्रबोधन केंद्र व संत रविदास चर्मकार सुधार मंडळ,वणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
     
१४ फेब्रुवारीला फुले,शाहू,आंबेडकर विचारवंत तसेच महाराष्ट्राच्या उत्कृष्ट वक्ता मा. सुषमाताई अंधारे यांचे जाहीर "प्रबोधन पर्व पहिले" आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतिभाताई धानोरकर, सरोजताई बिसुरे (राष्ट्रीय अध्यक्ष), किरणताई देरकर, मिनाताई भागवतकर (प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) असणार आहे.
    

तसेच संत रविदास महाराज जयंतीचे औचित्य साधुन १५ फेब्रुवारी शनिवारला सकाळी वणी शहरातील मुख्य मार्गाने आकर्षक अशी भव्य अभिवादन रॅली काढणार आहे. त्यांनतर लगेच " प्रबोधन पर्व दुसरे " आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव घोलप (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ), संजय देशमुख (खासदार, यवतमाळ-वाशिम) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार संजय देरकर, भानुदासजी विसावे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) माधवराव गायकवाड (प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ), रविंद्रजी राजुस्कर (राष्ट्रीय प्रवक्ता, चर्मकार महासंघ), संभा वाघमारे (विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
      

या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास चर्मकार सुधार मंडळ तसेच संबा वाघमारे (विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) यांनी केले आहे.
वणी शहरात गुरू रविदास जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन वणी शहरात गुरू रविदास जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 11, 2025 Rating: 5
Powered by Blogger.