सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : भाकप यवतमाळ जिल्हा कौंसिलची दि.9 फेब्रु.ला मारेगाव येथे एक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य कौंसिलर गुलाब उमरतकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य कौंसिलर अनिल हेपट, हिम्मत पाटमासे हे सुद्धा उपस्थित होते. सदर बैठकीत जिल्हासचिव अनिल घाटे यांने यांनी राज्याचा रिपोर्ट सादर केला,जिल्ह्यातील सभासद नोंदणीचा आढावा घेऊन आतापर्यंत विविध तालुक्यातील झालेल्या सभासद नोंदणीचा अहवाल मांडला.याप्रसंगी विविध तालुक्यातील प्रतिनिधींनी आपापल्या तालुक्यातुन आणलेली सभासद नोंदणी जिल्ह्याकडे जमा केली आणि उर्वरित सभासद नोंदणी येत्या 15 फेब्रु.पर्यंत जमा करण्याचे ठरले.
राज्याचे आदेशानुसार जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पक्ष शाखा परिषदांचा अहवाल मांडला आणि 28 फेब्रु.पर्यंत उर्वरित जुन्या शाखा व नविन शाखा परिषदा घेण्याचे ठरले. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने वणी येथे एप्रीलमध्ये राज्यव्यापी कापुस उत्पादक परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, पांढरकवडा, बाभुळगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस, नेर या तालुक्यातील जिल्हा कौंसिलर उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव बंडु गोलर यांनी केले तर, आभारप्रदर्शन जिल्हा सहसचिव संजय भालेराव यांनी मानले.
मारेगाव येथे भाकपची आढावा बैठक संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2025
Rating: