एकाच दिवशी दोन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यात एका पाठोपाठ दोन आत्महत्या झाल्याने तालुका हादरला आहे. केगाव येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच नवरगाव (धरण) येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 11 फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आली. कपिल रविंद्र परचाके (25) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
हाताला मिळेल ती कामे करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या कपिलने नैराश्येतून आत्महत्या केली. कुटुंबाचा आधारड असलेल्या तरुणाने मृत्यूला कवटाळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरी कुणी नसतांना त्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी कपिलचा मोठा भाऊ घरी परतल्यानंतर त्याला कपिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच ही माहिती कुटुंबियांना दिली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 
तसेच आत्महत्येची दुसरी घटना केगाव येथे घडली. एका शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. पवन अण्णाजी पिंपळशेंडे (34) रा. केगांव असे या विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवार दि. 11 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कर्जाच्या विवंचनेतुन त्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. अशी चर्चा ऐकीवात आहे.

मारेगाव तालुक्यात एका पाठोपाठ दोन आत्महत्या झाल्याने तालुका हादरला असून सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहे.
एकाच दिवशी दोन आत्महत्या एकाच दिवशी दोन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2025 Rating: 5
Powered by Blogger.