वणी: सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील तहसील परिसर हे तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असून ह्या ठिकाणी एकच जागेवर सर्वच अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच न्यायालय सुद्धा असल्याने खेड्यापाड्यातील व शहरातील गरजू जनता येत असते. त्यांना लागणारी काही महत्वाची प्रमाणपत्रे काढण्याकरिता सेतू सुविधा केंद्र हे ह्याच परिसरात शासनाच्या वतीने उघडलेली आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून हे सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने लोकांना पायपिट करावी लागत आहे आणि त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ताबडतोब तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कागदपत्रे काढण्याकरिता तहसील परिसरातील असलेल्या सेतू सुविधा केंद्रात सोईचे असल्याने येत असतात. त्यामुळे ते इतर कुठेही न जाता शासकीय कार्यालयातच कागदपत्रे काढण्याकरिता येत असतात. परंतु कागदपत्रे काढण्याकरिता आलेल्या नागरिकांना हे तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना आल्या पावले परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास करावा लागत असून परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागत आहे. 

नागरिकांची उपरोक्त ही समस्या लक्षात घेता तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र त्वरीत सुरू करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ॲड. दिलीप परचाके, ॲड. विप्लव तेलतुंबडे, ॲड. अविनाश बोधाने, ॲड. प्रवीण पुरी, ॲड. अमान एम आरिफ, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. लालू दडांजे, कॉ. भीमराव आत्राम आदींनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना केली आहे.
वणी: सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी वणी: सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2025 Rating: 5
Powered by Blogger.