सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : राजूर कॉलरी येथे एका विहिरीत सापडलेल्या इसमाच्या मृतदेहाचे रहस्य तब्बल एक वर्षानंतर उघड झाले. याप्रकरणी तिन संशयित आरोपीला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ती आत्महत्या नसून हत्याच केल्याचं नामदेव च्या मारेकऱ्यांनी कबुली दिली.
नामदेव शेनूरवार चा मृतदेह मागील वर्षी मार्च 2024 मध्ये रंगपंचमी च्या दिवशी रेल्वे सायंडींग परिसरातील एका पडक्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दिनांक 25/03/2024 रोजी पोलीस स्टेशन वणी येथे तक्रार नोंद केली होती. मात्र, हा खून अनैतिक संबंधातून आता झाल्याचे उघड झाले आहे. सिद्धार्थ मारुती शनुरवार (वय 34), दिवाकर शंकर गाडेकर (वय 28) व पिंटू उर्फ प्रवीण वामन मेश्राम (वय 39) तिन्ही रा. राजूर कॉलरी असे अटक आरोपीचे नाव आहे. या तिघांनी मिळून प्लॅन केला आणि मृतक नामदेव ला दारू पाजून गावाच्या निर्जनस्थळी नेवून तिथे लाथाबुक्क्यानी मारहाण केली, त्यानंतर त्याला विहिरीत फेकून दिले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार नामदेव शेनूरवार याच्या नात्यातच असलेल्या आरोपींनी कट रचून त्याला ठार केले. जवळपास एक वर्षानंतर नामदेवची हत्या करणारे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे. नामदेव शेनूरवार याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या तीनही आरोपींवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला गुन्ह्याचा साक्षीदार बनविल्याचे सांगण्यात येत आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि निलेश अपसुंदे, अविनाश बनकर, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, रितेश भोयर यांनी केली.
मर्डर मिस्ट्री : ती आत्महत्या नसून हत्याच!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 12, 2025
Rating: