सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव 2025 अंतर्गत शाहु, फुले, आंबेडकरी विचारवंत मा. सुषमाताई अंधारे उद्या शुक्रवार दि.14 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे येणार आहे.
श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, वणी व श्री संत रविदास चर्मकार सुधार मंडळ यांच्या वतीने शहरात सौ. अंधारे यांचे 'जाहीर प्रबोधन' पर्व पहिले आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या मार्गदर्शन करणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा खा. प्रतिभाताई धानोरकर (चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र), विशेष अतिथी सरोजताई बिसुरे (राष्ट्रीय अध्यक्ष, याष्ट्रकार महासंघ), किरणताई देरकर (अध्यक्ष, एकविरा बिगर शेती सहकारी पतसंस्था, मारेगाव), मिनाताई भागवतकर (प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ), अंजलीताई विसावे मा. नगराध्यक्षा धरणगांव नगरपालिका असणार आहे. तर प्रमुख उपस्थिती सुनीताताई लांडगे जिल्हा अध्यक्षा राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ, महिला आघाडी व प्रणोती बांगडे जिल्हा अध्यक्षा राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ, युवा आघाडी ह्या सुद्धा असणार आहेत.
या प्रसंगी सन्मान चर्मकार समाजातील कर्तुत्ववान महिलांचा, चर्मकार समाजातील शरिरीक अपंग महिलांचा, चर्मकार समाजातील विधवा महिलांचा, चर्मकार समाजातील ६० वर्षर्षावरील महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास चर्मकार सुधार मंडळ तसेच संभा वाघमारे (विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) यांनी केले आहे.
शाहु, फुले, आंबेडकरी विचारवंत सुषमा अंधारे उद्या वणीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 13, 2025
Rating: