पोलीस स्टेशन वणी येथील प्रलंबित असलेल्या एकूण 56 केसेस मधील जप्त मुद्देमाल रोडरोलर चालवून उध्वस्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : 'मद्य विरुद्ध युद्ध' अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई झाली आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी कडक कारवाई करत चार लाखाहून अधिक किमतीची दारू जप्त केली होती. तो दारूसाठा न्यायलयाच्या आदेशानुसार 12 फेब्रु. ला रोडरोलर चालवून उध्वस्त करण्यात आली.

यावेळी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग वणी, 
पंचासमक्ष घनकचरा व्यवस्थापन केंद्र भालर रोड,वणी येथे देशी विदेशी दारूच्या शिष्या, बम्पर, पव्वे, एकूण किंमत 4,13,257 रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला आहे.
                      
दिनांक 12/02/2025 रोजी मा.प्रथमश्रेणी न्यायालय क्रमांक 1 व 2 यांचे न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकूण 56 केसेस मधील जप्त मुद्देमाल नाश करण्याची परवानगी घेऊन मा.अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांचे आदेशान्वये एकूण 56 गुन्ह्यातील 9558, असा मुद्देमालाचा समावेश होता. 
पोलीस स्टेशन वणी येथील प्रलंबित असलेल्या एकूण 56 केसेस मधील जप्त मुद्देमाल रोडरोलर चालवून उध्वस्त पोलीस स्टेशन वणी येथील प्रलंबित असलेल्या एकूण 56 केसेस मधील जप्त मुद्देमाल रोडरोलर चालवून उध्वस्त Reviewed by सह्याद्री चौफेर on February 13, 2025 Rating: 5
Powered by Blogger.