काँग्रेस चे इच्छूक उमेदवार असलेल्या डॉ. झाडे यांचा टोला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून फार पूर्वीपासून तयारी सुरू असून आपण मैदान सोडलेले नाही. पक्षाचे आदेश आणि निर्णय सकारात्मक मिळतात जोमाने मैदान गाजवू अशी भूमिका काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवार डॉक्टर विश्वास झाडे यांनी आज येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केली आहे. 

इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे अर्ज केला मात्र प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर न राहिल्याच्या अफवा काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत यासाठी माध्यमांचाही चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे यावरून प्रतिस्पर्धी आपल्या उमेदवारीला घाबरले असल्याचा टोलाही डॉ. झाडे यांनी यात लगावला आहे.
 
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात गेल्या पाच वर्षापासून आपले सामाजिक कार्य सातत्याने सुरू आहे त्यामुळे इच्छुक क्षेत्रातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही उलट पक्षी या क्षेत्रात मागील निवडणुकीत मैदान गाजवल्या चा इतिहास बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला माहीत असल्याने जनतेच्या चर्चेतही आपले नाव अग्रक्रमावर असल्याचा दावा डॉक्टर झाडे यांनी केला आहे. 

माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात डॉक्टर झाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाला अर्ज करण्यासोबतच 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये सक्रिय सहभाग घेतला, यावेळी मुलाखतीत बाजू मांडली, त्यामुळे आपण सकारात्मक आहोत. पक्ष आपल्यासोबत इतर समाजाला सुद्धा योग्य वाव तसेच न्याय देईल अशी अपेक्षाही डॉ. झाडे यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस चे इच्छूक उमेदवार असलेल्या डॉ. झाडे यांचा टोला काँग्रेस चे इच्छूक उमेदवार असलेल्या डॉ. झाडे यांचा टोला Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2024 Rating: 5
Powered by Blogger.