विजेच्या लपंडाव विरुद्ध वंचित बहुजन आघाडी चे एकदिवशीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ, व्यावसायिक व शेतकरी वैतागले आहेत. ही समस्या न सुटल्यास महावितरण विभागाच्या विरोधात धरणे आंदोलन आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला होता, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना विविध मागण्याचे निवेदन दिले होते.
मात्र,वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत असताना याबाबत महावितरणच्या कर्मचार्‍यांशी संपर्क केल्यास तक्रारीकरिता संपर्क क्रमांक मिळत नसल्याचा आरोप होत होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी दि. 7 ऑक्टोबर रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन तहसीलच्या समोर करण्यात आले. या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव, विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेचा वारंवार लपंडाव होत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. येत्या काही दिवसात विजेची समस्या न सुटल्यास आणखी तीव्र स्वरूपात महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येईल, अशा आशयचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात परत देण्यात आले आहे. त्यामुळे या निवेदनाची दखल घेतील का याकडे वणी शहरासह ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष वेधले आहेत. 


विजेच्या लपंडाव विरुद्ध वंचित बहुजन आघाडी चे एकदिवशीय धरणे आंदोलन विजेच्या लपंडाव विरुद्ध वंचित बहुजन आघाडी चे एकदिवशीय धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2024 Rating: 5
Powered by Blogger.