सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कानडा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला ग्रामपंचायत यांच्यातर्फे आज (ता.09) वॉटर फिल्टर भेट देण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना शूध्द पाणी मिळावे व आरोग्य चांगले रहावे या हेतूने आरो फिल्टर बसविण्यात आले. बहूतांश आजार हे पाण्यातून होत असते व लहान मुलांवर आजारांचे संक्रमण लवकर होते, या सर्व गोष्टींची जाणीव लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सुषमा रुपेश ढोके यांनी पुढाकार घेतला.
त्यांच्या पुढाकाराने आता शाळेत व अंगणवाडीला शुद्ध पाणी मिळणे सुकर झाले आहे. सौ. सुषमा रूपेश ढोके यांचे हस्ते आज या पाणी फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाल्याने पालकांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक विद्यार्थी व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत चे सचिव ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेच्या विदयार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2024
Rating: