टॉप बातम्या

कपाशी पीकात रान डुकरांचा हैदोस; शेतकरी अडचणीत, वनविभागाचे दुर्लक्ष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील यंदा शेतकऱ्यांनी हंगामी सोयाबीन सोबत कपाशी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होता. परंतु वन्य प्राणी आणि रानडुकरांनी शेतीची नासधूस केल्याने मोठे नुकसान झाले आहे.

डोल मच्छिन्द्रा या परिसरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. आणि नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु वन्य विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या वनविभागाकडे तक्रार असूनही वन विभाग दुर्लक्ष करून दखल घेत नाही असा नाराजीचा सूर शेतकरी बांधवातून होत आहे. 

डोल डोंगरगाव शेत शिवारातील विनोद पारोधी व चंद्रहास्य झाडे यांच्या शेतातील कपाशी वन्यप्राण्यांनी हैदोस घालून मोठ्या प्रमाणात नासधूस केली असे शेतकऱ्यांना सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाकडून कडून शेतीचा पंचनामा करण्यात यावा, व आर्थिक मदत तत्काळ मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Previous Post Next Post