सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटली नसुन नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: महिला वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. स्थानिक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने याबाबत निवेदन चंद्रपूर मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे.
एका आठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. या शिवाय सुगत नगर नगिनाबाग येथील नाल्यांची अवस्था बिकट झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. या नाल्या रोगराईला आमंत्रण देत असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी ही बाब प्रामुख्याने नमुद केली आहे.
यावेळी मनपाला निवेदन देतांना तनुजा रायपुरे, मोनाली पाटील, चंद्रप्रभा रामटेके, सुलभा चांदेकर या शिवाय वंचित बहुजन महिला आघाडीच्या विजया भगत, कल्पना शेंडे, रेखा उमरे, चंदा सहारे, सुनंदा भगत, नंदा बावणे, सुनंदा फुलमाळी, पुष्पा ठमके, प्रियंका चहांदे, सविता जिवणे, शरयू रोडके, आशा भसारकर, पुष्पा गाणार, रेखा उमरे, तृप्ती उराडे, शोभा नरवाडे, अश्विनी नरवाडे, आशा उराडे, ज्योती उंदीरवाडे, शोभा वाघमारे, इंदुताई डोंगरे आदिं पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
वंचित बहुजन महिला आघाडीचे मनपा प्रशासनाला निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2024
Rating: