जगन्नाथ महाराज विद्यालय खोखो चमू अजिंक्य

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नुकत्याच माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मारेगाव तालुका स्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धा पंचशिल विद्यालय नवरगाव येथे घेण्यात आल्या.त्यामध्ये मारेगाव तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला.

यामध्ये श्री.जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव च्या सतरा वर्षाखालील वयोगटाच्या मुलींच्या खो खो संघाने मारेगाव तालुक्यात अजिंक्यपद पटकावले.या मुलींच्या संघाला शिक्षिका कु.वैशाली मोवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

अजिंक्य चमुचे मुख्याध्यापक नरेश वाघमारे,संस्थेचे सचिव श्री.संजय देरकर तथा विद्यालयाच्या सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी अभिनंदन केले.
जगन्नाथ महाराज विद्यालय खोखो चमू अजिंक्य जगन्नाथ महाराज विद्यालय खोखो चमू अजिंक्य Reviewed by सह्याद्री चौफेर on August 31, 2024 Rating: 5
Powered by Blogger.