सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष धनराज येसेकर यांनी शिवसेना नेते संजय देरकर यांच्या उपस्थितीत आज शनिवारी ३१ ऑगस्ट ला शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्तासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी संदेश टिकत, हर्षल गूहे, भोला पानघाटे, निकेश कडूकर, कार्तिक चांदेकर, चिंतन लोडे, निरक लोणारे, आर्या राऊत, प्रेम भटगरे, आशिष पिदुरकार, बादल येसेकर, धनराज मडावी, जावेद पठाण, सुजल जुमडे, कुणाल आगुलवर, हर्षल मडावी, संकेत विधाते, तेजस बागडे, आदित्य पाटिल, शेजल जुमडे,यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला.
मागील कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहणारे राष्ट्रवादी पक्षाचे धनराज येसेकर यांच्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. युवासेना उप जिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सर्व शिवसैनिक भगवान मोहिते, विनोद दुमने, चेतन उलमाले, मनिष बत्रा, साकेत भुजबळराव, उपस्थितीत होते.
"गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" हे अभियान वणी विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी सुरू केले आहे. यावेळी शेकडो तरुणांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना-युवासेनेत प्रवेश केल्याने पक्षाला नवसंजिवनी मिळाली आहे.
वणी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2024
Rating: