पटवारी संतोष पवार यांच्या हत्येचा बिगर सात बारा शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : हिंगोली जिल्ह्यात पटवारी संतोष पवार यांची खुलेआम भर दिवसा हत्त्या झाली त्याची पुनरावृत्ती पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी पटवारी संवरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी पांढरकवडा तहसीलदार मार्फत उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.

पुढें निवेदनात नमूद आहे की,सदर घटना माणुसकीला च नव्हे तर लोकशाहीला काळीमा फासणारी आहे कारण कोणत्याही सरकार मध्ये महासुल विभाग हा अतिशय महत्वाचा भाग असुन त्याच्या कणा म्हणजे पटवारी आहे त्याचीच भरदिवसा हात्त्या होत असेल तर या पेक्षा आपल्या सरकारचे दुर्दैव कोणतेही दुसरे नाही म्हणून पटवारी संतोष पवार यांच्या हत्येची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी पटवारी संवरक्षण कायदा घोषित करा अशी मागणी करुन लवकरच बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पटवारी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे सहीत दिलीप मडावी, पुरुषोत्तम कोदापे, नीलखंड मडावी, नागोराव मडावी, शंकर मरस्कोल्हे, रामचंद्र सिदम, रामकिसन कुमरे यासह बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे महिला अध्यक्षा श्रीमती रेश्मा अगिलवार उपस्थित होत्या.
पटवारी संतोष पवार यांच्या हत्येचा बिगर सात बारा शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध पटवारी संतोष पवार यांच्या हत्येचा बिगर सात बारा शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on August 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.