सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील गोरज येथे वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहेत.
निर्मला किसन आत्राम (अंदाजे वय 38) असे वीज पडून मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुपारी गोरज शेतशिवारात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करित असताना मृतक महिला गावाच्या दिशेने निघाली असता दुपारी 3.15 वाजता च्या दरम्यान घराच्या दारात ती पोहचण्याच्या अगोदरच गावाच्या जवळच वीज पडल्याने निर्मला आत्राम ही विवाहित महिला जागीच मृत पावल्याचे माहिती आहे.
आज दि. 30/8/2024 रोज शुक्रवारला दुपारी दोन अडीज वाजता च्या दरम्यान गोरज परिसरात ढगाळ वातावरण होऊन जोरदार पाऊस पडायला सुरूवात झाली होती, पावसामुळे ती घराकडे निघाली असता अगदी गावाच्या लगत असलेल्या एका बंड्या जवळच अचानक वीज पडून निर्मला आत्राम या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
तीच्या पश्चात पती, दोन मुलं असा बराच आप्त परिवार आहे.
गोरज येथे वीज पडून महिलेचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 30, 2024
Rating: