सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मौजे आडगांवं रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भरदिवसा निघृण हत्या झालेली असून या भ्याड हल्याचा विदर्भ पटवारी संघ तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून ही हत्या एका तलाठ्याची नसून ही समग्र महसूली व्यवस्थेची हत्या आहे. अशी विदर्भ पटवारी संचाची धारणा झाली आहे.
सदर घटनेतील दोषीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्यांचे कुटुंबियांस न्याय मिळवून द्यावा तसेच तलाठी/मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासन प्रशासनाने ठोस पावले उचलावी यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी/पटवारी/मंडळाधिकारी समन्वय महासंघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काल विदर्भ पटवारी संघ नागपूरचे वतीने गुरुवार दि.29/08/2024 रोजी उपविभाग वणीतील सर्व तलाठी एक दिवशीय कामबंद आंदोलन पुकारत कडकडीत निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान,वणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वणी उपविभागीय शाखेचे सर्व पदाधिकारी व तलाठी कर्मचारी उपस्थित होते.
हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ वणीत काम बंद आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 30, 2024
Rating: