सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात उप विभागीय अभियंता, वणी यांना निवेदन देण्यात आले. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे.
शहरात विविध रोगराई ने डोकं वर काढले असता शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने उष्णतेच्या उकाड्याने वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून वणीकरवाशी व परिसरातील नागरिक घेत आहेत. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत विचारणा करतोय म्हटलं तर कोणीही बोलायला तयार नसल्याने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी सार्वजनिक करावे अशी, मागणी निवेदनातून करण्यात आली. विजेची तक्रार केल्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते असा आरोप देखील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला आहे. वरील नमूद सर्व बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही व्हावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरिष पाते, सह मिलिंद पाटील, प्रदीप मडावी, शारदा मेश्राम, उत्तम मडावी, संतोष पेंदोर, शिवेंद्र ब्राह्मणकर, गजानन दामोदर, विलास दुर्गे, कपिल मेश्राम, मारोतराव कोठेकर, सिद्धार्थ गोमासे, अर्चना नगराळे, प्रशांत गाऊत्रे, विशाल देठे, वैशाली गायकवाड, बुद्धघोष लोणारे,प्रणिता ठमके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तिकडे रोगराईने डोकं वर काढले इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडावाने वंचित बहुजन आघाडी आक्रमक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 30, 2024
Rating: