सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
राजुरा : आदिवासी टायगर सेना विदर्भ च्या वतीने सन २०२३-२०२४ या सत्रात पास झालेले गुणवंत विद्यार्थी, १० वी पास,१२ वी पास, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा पास, शिष्यवृत्ती परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी, वैद्यकिय परीक्षा, अभियांत्रिकी पदवी परीक्षा, तसेच नवीन नियुक्ती झालेल्या कर्मचारी व ए.एस.आय. म्हणून पदनियुक्ती झालेल्या पोलिस बांधवांचा तसेच खेळात समाजाचे नावलौकिक करणाऱ्या समाज बांधवांचा विदर्भ स्तरीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, अॅड. जितेश कुलमेथे विदर्भ महासचिव, डॉ. किर्तीकुमार उईके विदर्भ उपाध्यक्ष ह्यांनी दिली आहे.
समाज बांधवांनी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी सर्व जिल्ह्यातील आदिवासी टायगर सेना चे तालुका अध्यक्ष ह्यांना गोळा करण्याचे आदेश प्रा.हितेश मडावी, मोरेश्वर उईके जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, प्रा. प्रियदर्शन मडावी, लिना उईके/कोकोडे, जिल्हा अध्यक्ष गडचीरोली, विठ्ठल सोयाम, जीवन तोडसाम जिल्हा अध्यक्ष यवतमाळ ह्यांना दिले आहेत.
संपूर्ण विदर्भातून यादी तयार करून त्या त्या जिल्ह्यात नियोजन करून सत्कार सोहळे यशस्वी करण्यासाठी सुरेश मेश्राम विदर्भ उपाध्यक्ष, पुष्पलता कुमरे विदर्भ उपाध्यक्ष, शुभांगी मेश्राम विदर्भ उपाध्यक्ष, सुमित्रा अलाम विदर्भ महासचिव, आरती कोल्हे विदर्भ सचिव, धनराज कुळमेथे विदर्भ संघटक, मालता पूदो विदर्भ संघटिका ह्यांनी सहभाग घेतला आहे.
तरी सर्व आदिवासी गुणवंत विद्यार्थी व नव नियुक्त समाज बांधवांनी नावे तालुका अध्यक्ष आदिवाशी टायगर सेनेकडे देण्याचे करावे असे आवाहन करण्यात येत आहे.