टॉप बातम्या

युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे युवकांचा मनसेकडे वाढत असलेला ओघ आणखी वाढत चालला असून वणी तालुक्यातील तरोडा येथील युवकांनी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी उंबरकर यांनी युवकांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

मनसेत होत असेलेली सतत इन्कमिंग हे आगामी काळात संघटन मजबुतीचा पाया भक्कम करणारा आहे. विविध सामाजिक उपक्रमात मनसेची असलेली आघाडी त्याचबरोबर आक्रमक भूमिका आणि पक्षनेते राजू उंबरकर यांच्या लोकप्रियतेने अनेक युवक मनसेत सामील होत आहेत. शहरातील शिवमुद्रा या जनसंपर्क कार्यालयात आज (१५ मे) रोजी युवकांनी पक्ष प्रवेश करत मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. 

मनसेचे विचार पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे धेय्य धोरणे आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम निश्चितपणे करतील असा विश्वास उंबरकर यांनी व्यक्त केला. प्रसंगी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, माजी नगरसेवक राजू डफ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post