टॉप बातम्या

बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने सन 2024 चा खरीप हंगाम संरक्षण यात्रेचा प्रारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
                                   
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या कब्जात असलेल्या महसूल व वन विभागाच्या जमिनी दरवर्षीप्रमाणे सन 2024 च्या खरीप हंगामात पेरणी करणार असून त्यांचा प्रतिवेदनात्मक अहवाल पटवारी यांच्यामार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात यावी अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. 
 
त्याबाबत सन 2024 चा खरीप हंगाम संरक्षण यात्रेचा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री उरकुडा गेडाम व श्यामा दादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमर, युवा नेते अजय खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. सदर यात्रा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात भ्रमण करणारा असून वेगळा सातबारा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बिगर सातबारा शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार त्यांच्या सोबत होणारी पिळवणूक भेदभावाची वागणूक जसे खरीप हंगामात पेरणी केलेली असताना पटवारी पिकांच्या नोंदी करीत नाही प्रधानमंत्री पीक विमा योजना ची अंमलबजावणी करताना बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचा पिक विमा भरून घेतल्या जात नाही बिगर सातबारा शेतकरी बियाणे विकत घेताना त्यांच्याकडून जीएसटी वसूल करण्यात येते व नुकसान भरपाई मिळत नाही असे असंख्य प्रकार आहेत जे अन्यायकारक आहेत तर असा अन्याय होऊ नये म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने सन 2024 चा खरीप हंगाम संरक्षण यात्रा आयोजित केली असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदनाद्वारे माहिती सादर करण्यात आली. 

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे ज्येष्ठ नेते उरकुटे गेडाम श्यामा दादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे युवा नेते अजय खाडे समशेरसिंग भोसले फासेपारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास भाऊ पवार संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे मेळघाट संपर्कप्रमुख हिरालाल बेठेकर, शालकु मावस्कर, मंगल बेठेकर, श्यामजी उईके उपस्थित होते.



            
Previous Post Next Post