सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर
पुणे : अयोध्या राम नगरी येथे प्रभू श्रीराम जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधत आज दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सहयोगनगर, तळवडे येथे महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. खूप अनंदात व जोशात कार्यक्रम पार पडला. या वेळी सर्व नागरिकांनी प्रभू श्री रामचंद्रांचे घोषणानी संपूर्ण पसरीसर गाजवला. २१ जोडप्यांच्या हातून ही महाआरती संपन्न झाली. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष देवेंद्र निकम,शाखा अध्यक्ष सागर सोनटक्के,नामदेव जेडगुले,वैभव पाटील,तन्मय इंगळे,वेदांत वराडे,ज्ञानेश्वर गुंड,कारण कुचेकर,जयेश चौधरी व शिवपर्वती मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.