सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : तालुक्यातील विरकुंड नवेगाव येथे लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना चे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. यात बौद्धिक सत्र संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
वणी शहरातील सागर झेप बहुउद्देशी संस्थेच्या वतीने संदेशात्मक व मनोरंजनात्मक लोकनाट्य सादर करण्यात आले. शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्यासाठी अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने कांदा पोहे,या नाटीके द्वारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, अशोक सोनटक्के, सबआय लाईफ इ्शुरन्स चे सिनियर एजेंसी मॅनेजर शैलेश अडपावर, प्रा. सीमा सोनटक्के, प्रिया कोणप्रतीवार, यांनी आपल्या उत्कृष्ट कलेच्या द्वारे रसिकांना खिळवून ठेवले.
"पप्पा" या लघुनाटीके संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी विविध प्रकारचे अभिनय करून त्यांना पप्पा लघु नाटकातील सासरे प्रवीण सातपुते यांचे धक्का देणारे संवाद, निखिल वाघाडे याचा हसवणारा भाऊजी हा संवाद आणि पप्पा म्हणून सतत बोलणारी सोनम सुरपाम यांनी जबरदस्त छाप सोडल्याने गावातील रसिकांना चांगलेच हसून हसून लोटपोट केले. सुनंदा गुहे यांनी शिक्षण, आरोग्य, यावर आधारित अभिनया द्वारे लोकगीत सादर केले. पेसा या लोकनाट्य द्वारे सर्व कलावंतांनी विशेषतः संदीप उरकुडे यांच्या मागे कुत्र लागलेल्या अवस्थेत मंचावर प्रवेश झाला व हागणदारी वर एकापेक्षा एक संवाद करून रसिकांना हसून हसून लोटपोट केले.
या लोकनाट्यला पार्श्वसंगीत गौरव नायनवार, ढोलक कुंदन खापने यांनी सुरेख साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ विकास जुनगरी व आभार प्रा. निलिमा दवणे यांनी केले.
'पप्पा" लघु नाटकाची धमाल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 23, 2024
Rating: