टॉप बातम्या

नेत्रदोष असणाऱ्यांना मिळेल नवी दृष्टी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणीः स्माईल फाउंडेशनने 'नवी दृष्टी' हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्याला वणीतील ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दोन ऑपरेशन मोफत करणार आहेत.

मोतीबिंदू, तिरळेपणा किंवा ऑपरेशनयोग्य जे काही डोळ्यांचे दोष असतील ते काढले जातील. यासाठी स्माईल फाउंडेशनच्या एस.पी.एम शाळेजवळील वॉटर सप्लाय येथील कार्यालयात संपर्क साधण्याची विनंती स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केली आहे.

मोफत नोंदणीसाठी सागर जाधव 7038204209, आदर्श दाढे, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post