बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना बुक वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्याने शहरातील प्रभाग क्र.9 येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बुक वाटप करण्यात आले.

आज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. मारेगाव शिवसेना शाखा (ठाकरे गट) च्या वतीने त्यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषद च्या शालेय विद्यार्थ्यांना बुकचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, कृ. ऊ बा समिती चे उपाध्यक्ष जीवन काळे, बाजार समिती संचालक विजय अवताडे, बाजार समिती संचालक सौ. सुनीता मस्की, माजी जि प. सदस्य सुनील गेडाम, मयूर ठाकरे (ता. अध्यक्ष युवासेना), ब्रम्हदेव जुनगरी, गणेश आसुटकर (शहर प्रमुख), पंकज नेहारे, अतुल देवगडे, राजू मोरे, नंदकुमार तामगाडगे, उपसरपंच गजू ठाकरे (कुंभा) यासह तालुक्यातील महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. 
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना बुक वाटप बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना बुक वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on January 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.